मुख्य बातमी

भाजपा शहरातर्फे आयोजित गणेशोत्सव ऑनलाइन स्पर्धेचे बक्षीस वितरण

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, युवा जिल्हाध्यक्ष मंदार खांडकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, तसेच मनोज पाटणकर, नीलेश आखाडे, संदीप सुर्वे, शैलू बेर्डे, नितीन जाधव, समीर वस्ता यांसारखे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश आखाडे यांनी केले. यावेळी बोलताना भाजपा रत्नागिरी शहराच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे नमूद केले. रत्नागिरी शहरातील ४५ पेक्षा अधिक गणेशभक्तांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सर्वच गणेशभक्तांनी बाप्पासाठी चांगली सजावट केल्याचेही ते म्हणाले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी या स्पर्धेचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपले मत व्यक्त करताना दरवर्षी अशी स्पर्धा घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना शहर मंडळ भाजपा यांनी उत्तम नियोजन करून ही स्पर्धा संपन्न केल्याबद्दल सर्व कार्यकर्ते आणि सहभागी व विजेते यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक साईराज प्रकाश नाचणकर (तेली आळी) यांना मिळाले. द्वितीय पारितोषिक अर्जुन गोलतकर (नाकोडा पार्क, पावर हाऊस, नाचणे रोड) यांनी, तर तृतीय पारितोषिक शुभम सचिन आडमकर (मच्छी मार्केट) यांना मिळाला. या सर्वांना शिल्ड व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

उत्तेजनार्थ दीपिका दिनेश कुबल (भगवती बंदर) आणि मयूर राजेंद्र आग्रे (सुवरेवाडी) यांनी पटकावला. त्यांनाही शिल्ड व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखत नवनवीन माध्यमांतून सहभागी होण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, सरचिटणीस नीलेश आखाडे व संदीप सुर्वे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी करून संपूर्ण सोहळा संस्मरणीय केला.

या स्पर्धेचे परीक्षण कला क्षेत्रात नॅशनल विजेते विलास रहाटे यांनी पाहिले. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामुळे संपूर्ण सोहळ्यात आनंदाचे व सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!