राज्य अजिंक्यपद खो-खोच्या महासंग्रामाची गटवारी जाहीर

बीड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व बीड अमेच्युअर खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान बीडमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर झाली असून गतविजेते पुणे व धरशिवाने पुन्हा एकदा विजेतेपदासाठी जोरदार तयारी केल्याचे बोलले जात आहे.
या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ४.३० वा. श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पार पडणार असून त्यावेळी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, छ. संभाजीनगर विभागाचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रजीत जाधव, बीडचे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे, बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन गोडबोले, भारतीय खो-खो महासंघाचे कोषाध्यक्ष गोविंद शर्मा, ॲमॅचुअर खो-खो असो. बीडचे अध्यक्ष ऋषिकेश शेळके, सचिव विजय जाहेर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गटवारी अशी : पुरुष गट : अ गट – पुणे, रायगड, छ. संभाजीनगर. ब गट – मुंबई उपनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग. क गट – सांगली, जळगाव, बीड. ड गट – धाराशिव, रत्नागिरी, लातूर. इ गट – मुंबई, परभणी, हिंगोली. फ गट – सोलापूर, नाशिक नांदेड. ग गट – अहिल्यानगर, धूळे, जालना. ह गट – ठाणे, सातारा, पालघर.
महिला गट : अ गट – धाराशिव, लातूर, परभणी. ब गट – सांगली, रायगड, जळगाव. क गट – पुणे, सातारा, सिंधुदुर्ग. ड गट – नाशिक, जालना, बीड. इ गट – रत्नागिरी, नंदुरबार, छ. संभाजीनगर. फ गट – सोलापूर, अहिल्यानगर, हिंगोली. ग गट – ठाणे, धुळे, नांदेड. ह गट – मुंबई, मुंबई उपनगर, पालघर.


