क्रीडामुख्य बातमी

मोबाईलच्या विळख्यात न अडकता मुलांनी खेळात सहभागी होणे महत्त्वाचे : ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे 

अजिजा हाईट्स स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट स्पर्धेचे श्री. खलफे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : “आजची पिढी ही फक्त मोबाईलमध्ये अडकून असते. नुसत्या मोबाईलमध्ये न अडकता मुलांनी खेळात सहभागी व्हावे. तसेच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. खेळामुळे आपण तंदुरुस्त राहतो म्हणून अभ्यासासोबतच खेळाकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांनी केले.

शहरातील अजिजा हाईट्स स्पोर्ट क्लबतर्फे अंडरआर्म क्रिकेट सामने भरवण्यात आले होते. हे सामने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण सहा संघानी सहभाग घेतला. ही स्पर्धा तीन षटकांची खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत विजेत्या संघासह उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासह वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!