मुख्य बातमी

शिर्के प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

रत्नागिरी : येथील रा. भा. शिर्के प्रशालेच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रम नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी, तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पुनम पवार यांनी केले. प्रशालेमध्ये चित्र, हस्तकला वस्तू आणि रांगोळी प्रदर्शन मांडले होते.

“आयुष्यात जास्तीत जास्त बक्षीसे मिळवून प्रशालेचे आणि पालकांचेही नाव उज्ज्वल करा” असा सल्ला श्रीमती पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख अतिथी म्हणून आपल्या मनोगतात प्रशालेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना “भरपूर पुस्तके वाचा आणि मोबाईलचा कमीत कमी वापर करून उत्तम खेळ खेळा व आरोग्यसंपन्न बना” असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी केले. वार्षिक पारितोषिक वाचन सौ. सप्रे यांनी तर वार्षिक अहवाल वाचन पर्यवेक्षिका सौ. कांबळे यांनी केले. यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून वेद डोईफोडे, तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून वेदांतिका पवार, आणि पवित्रा देवस्थळी यांना तसेच आदर्श खेळाडू विद्यार्थी ओम दिनेश परकार, आदर्श खेळाडू विद्यार्थिनी सानवी पराग सुर्वे, अष्टपैलू विद्यार्थिनी चैत्राली नारायण सुर्वे, अष्टपैलू आदर्श विद्यार्थी वेदांत सनये यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी श्री. पाटील, सौ. गुळवणी, बागवे, सौ. साखळकर, श्री. मयेकर, श्री. आयरे, श्री. साळवी, श्रीम. शिर्के आणि प्रशालेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. डोईफोडे यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. मुंडेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!