कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी
दादर – रत्नागिरी आणि दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन होळीनंतर कायमस्वरूपी सुरू ठेवावी
माजी खासदार, शिवसेना नेते विनायक राऊत व खासदार संजय दिना पाटील यांची जनरल मॅनेजर, सेन्ट्रल रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील दादर – रत्नागिरी आणि दादर – सावंतवाडी पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू व्हावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेतली होती. तसेच सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला कोकण रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद देत होळीसाठी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

या दोन्ही ट्रेन कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी माजी खासदार, शिवसेना नेते विनायक राऊत व खासदार संजय दिना पाटील यांनी मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.


