मुख्य बातमी

‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजने’तून नवउद्योजकांना मिळणार आर्थिक बळ; समाज कल्याण विभागाचे आवाहन

रत्नागिरी : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत ‘मार्जिन मनी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नवउद्योजक व महिला उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.

योजनेचे मुख्य स्वरूप व आर्थिक रचना :

कर्ज मर्यादा: रु. १० लाख ते रु. १ कोटी.

बँक कर्ज: प्रकल्प मूल्याच्या ७५ टक्के रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात.

मार्जिन मनी (शासकीय सहाय्य): १५ टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मार्जिन मनी स्वरूपात उपलब्ध.

स्वहिस्सा: केवळ १० टक्के रक्कम अर्जदाराला स्वतः भरावी लागेल.

पात्र व्यवसाय व निकष :

मान्यताप्राप्त उद्योग, उत्पादन (Manufacturing), सेवा क्षेत्र (Services), कृषीपूरक व्यवसाय किंवा ट्रेडिंग (व्यापार) सुरू करण्यासाठी ही योजना लागू आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज प्रकरण मंजूर असणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीतील घटकांमध्ये उद्योग उभारणीला चालना देणे आणि महिला उद्योजक तयार करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!