मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

कुरधुंडा गावच्या सरपंचपदी नाझिमा बांगी यांची बिनविरोध निवड

संगमेश्वर : तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुरधुंडा गावच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नाझिमा हसन बांगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गावाच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि किंगमेकर आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून, गावाच्या विकासाबरोबर पाणी आणि आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना हा अजेंडा घेऊन पुढे जाणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच नाझीमा बांगी यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्या आदेशानंतर आज (१२ मार्च) देवरूखचे नायब तहसीलदार सुदेश गोताड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक झाली. आजच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नाझीमा बांगी यांची बिनविरोध निवड केल्याने त्यांचे गावाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्रभारी सरपंच तैमूर अलजी, माजी सरपंच सबा अलजी, जमूरत अलजी, शाहिस्तां एलजी, पोलिस पाटील नफिसा फकीर, नाझीम अलजी, ग्रामसेवक श्रेय्या भायजे, सर्कल तलाठी संदेश घाग जमातीचे सदर असगर अलजी, अब्दुल्ला मालगुंडकर, उमर अलजी, लियाकत काझी, साबीर मालगुंडकर, शौकत अलजी, इरफान नेवरेकर, रइस अलजी, अरफात फकीर, हुसैन अलजी, फैय्याज हाजू, अन्वर गोलंदाज, सऊद धामस्कर, समरान खान, संजय जाधव, आवेज बांगी, अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख शकील डिंगनकर, जिब्रान तांडेल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!