घोषणांचा पाऊस, पण कसब्यात कामाचा दुष्काळ
छ. संभाजी महाराज स्मारकावरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

संगमेश्वर : तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या स्थळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली आणि परिसराची पाहणी केली.
संगमेश्वर येथील कसबा येथे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी आमची मागणी आहे. याठिकाणी भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी भक्त घोषणा करण्यात आली मात्र कोणतेही काम सुरू नाही. पालकमंत्री फक्त घोषणा करतात; मात्र ते कोणतेही काम करीत नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेले आहे. मात्र संभाजी महाराजांच्या स्मारकानिमित त्यांनी दिलेला शब्द पाळावा.
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी घोषणा करण्यात आली. मात्र स्मारक कोठे दिसत नाही. मुख्यमंत्री, अर्थमंत्री याठिकाणी येऊन गेले. इतर ठिकाणी ज्याप्रमाणे विकास झाला त्याप्रमाणे त्याठिकाणी विकास व्हावा या स्मारकासाठी निधीची अडचण नाही; मात्र राजकीय इच्छाशक्तीची अडचण असल्याचे सकपाळ म्हणाले.
याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष काशीनाथ वाझे, फैज पाटणकर, मुरलीधर बोरसुतकर, इलियाज मापारी, अशोक पवार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



