माजी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा महिलाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा येथील कै. श्रीमती जानकी (आक्का) तेंडुलकर महिलाश्रममधील निराधार मुलींसाठी त्यांना दैनंदिन जीवनामध्ये लागणार्या साहित्याचे वाटप तसेच गोड भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या संस्थेमध्ये जवळपास ५० मुली असून त्यांना टॉवेल, तेल, पावडर, साबण, फणी, ब्रश-टूथपेस्ट व खाऊ अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, महिला उपजिल्हा संघटक सौ. उल्का विश्वासराव, उपविभागप्रमुख राजेंद्र सुर्वे, सरपंच पुनस संतोष लिंगायत, शांताराम गुरव यादी शिवसैनिक उपस्थित होते.

या संस्थेच्या संचालिका सौ. बेलवलकर, श्रीमती कांबळे यांच्यासह कर्मचारी आणि मुलींनी याबद्दल समाधान व्यक्त केले आणि माजी खासदार विनायक राऊत यांना निरोगी आयुष्य लाभो, अशी सद्भावना व्यक्त केली.


