मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोली येथील बबन काजरोळकर यांचे निधन

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र बबन मोतीराम काजरोळकर (६६ वर्ष) यांचे १३ मार्च रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गावात सर्व समाजात मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व तसेच साधी राहणीमान, हसतमुख चेहरा आणि दुसऱ्यांच्या सुख-दु:खात धाऊन जाणारे अशी त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती.

त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण आबलोली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!