मुख्य बातमीशैक्षणिक

मालगुंड विद्यालयात फिरत्या अणुऊर्जा प्रदर्शनातून केली जनजागृती

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजमध्ये न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत अणुऊर्जा जनजागृती व फिरते प्रदर्शन (ऍटम ऑन व्हील्स) २० मार्च रोजी दाखल झाले.

अणुऊर्जेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी व अणुऊर्जा किती आवश्यक आहे हे या फिरत्या प्रदर्शनातून सांगितले. १०मिनिटांच्या एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. अणुऊर्जा का आवश्यक आहे तसेच अणुऊर्जा प्रकल्प चालू झाल्याने त्याचा आजूबाजूच्या भागात काय काय चांगले परिणाम होतात व ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येतो त्या भागाचा विकास होतो अशा प्रकारची उपयुक्त माहिती या व्हॅनसोबत आलेले श्री. ठाकरे यांनी दिली.

या वातानुकूलित व्हॅनमध्ये अणुऊर्जेसंदर्भात विविध प्रकारची लिखित स्वरूपातील माहिती जनजागृतीपर ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ही माहिती वाचली व त्याद्वारे त्यांच्या मनातील अणू ऊर्जेबाबत असलेले गैरसमज थोड्याफार प्रमाणात दूर झाले. आपल्या परिसरातील नागरिकांना अणुऊर्जा काय आहे, ती का आवश्यक आहे हे पटवून सांगा असे आवाहन या माध्यमातून श्री. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!