मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वेरळ येथे १४ पासून लक्ष्मीकांताचा वार्षिकोत्सव

लांजा : तालुक्यातील वेरळ येथील श्री देव लक्ष्मीकांताचा प्रतिवार्षिक उत्सव १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत श्रीक्षेत्र लक्ष्मी केशव मंदिर येथे साजरा होणार आहे.

यावर्षी उत्सवाचे व्यवस्थापन अरुण देव, सुभाष देव (पुणे), अरविंद देव रतलाम व देव कुटुंबातील इतर मंडळी करणार आहेत. उत्सवात दररोज रात्री ८.३० वाजल्यापासून आरत्या, भोवत्या, मंत्रपुष्पांजली, कीर्तन, दीपोत्सव पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहेत.

उत्सवात कीर्तन सेवा ह.भ.प. दत्तात्रय उपाध्ये (कुडाळ) करणार आहेत.त्यांना साथसंगत संवादिनी साथ योगेश सरपोतदार व तबलासाथ प्रसाद पटवर्धन रत्नागिरी करणार आहेत. १६ व १७ नोव्हेंबर व १९ व २० रोजी दुपारी १ वाजता सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे. १९ रोजी सायंकाळी दीपोत्सव साजरा होईल. २० रोजी ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

उत्सवासाठी देणगी / उत्सव वर्गणी पाठवायची असल्यास लक्ष्मीकेशव संस्था, वेरळ या नावाने चेकद्वारे पाठवावी. अगर बॅंक ऑफ इंडिया लांजा शाखा A/C No.140210110015888 & IFSC CODE – BKID0001402 या खात्यावर पाठवावी. उत्सवात येणाऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्थेसाठी उत्सवाला येणाऱ्यांनी सौ. अंजली गुणे (मोबाईल 9356948571) व सुरेश गुणे (मोबाईल 9049649378) यांना कळवावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!