कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी
ओरोस येथे उद्या काव्योत्सव

सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त उद्या (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ४.३० वाजता ‘काव्योत्सव’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. निलेश गावकर (साळशी), कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे (कणकवली) निमंत्रित कवी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.
तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या कवींच्या कविता ऐकण्याचा योग या कार्यक्रमात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व सर्व कवी परगावचे असल्याने कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.


