मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नेत्रावती आणि मत्स्यगंधा गाड्यांना जनरल डबे वाढवावे

बळीराज सेना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांची रेल्वे प्रशासनकडे मागणी

आबलोली : मुंबई येथून कोकणात येणाऱ्या मत्स्यगंधा व कोकणकन्या एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना प्रचंड प्रवाशांची गर्दी होत असून, या दोन्ही गाड्यांना पुढे आणि मागे जनरल डबे वाढवावेत. यामुळे आमच्या कोकणातील सर्वसामान्य प्रवाशी जनतेचे प्रवासात हाल होणार नाहीत. रेल्वे प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी आणि जनरल डबे वाढवावे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार पराग कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

कोकणातील जनता प्रामुख्याने मुंबई शहरांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त ये-जा करीत असते. कोकण रेल्वेच्या जनरल डब्यांच्या गाड्या प्रवासासाठी असले, तरी या गाड्यांना आवश्यक गती नसल्याने प्रवासी मत्स्यगंधा व नेत्रावती या गाड्यांनी प्रवास करतात. तात्काळ तिकिटामध्ये जनरल डब्यातून प्रवास करतात. जनरल डबे जाग्यावरच फुल होतात. त्यामुळे अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांना या डब्यामध्ये चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागते. काही प्रवासी जीवावर उदार होऊन प्रवास करतात.

या सर्वांची रेल्वे प्रशासनाने या गंभीर दखल घेऊन जनरल डबे वाढवावेत आणि कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पराग कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!