आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा

रत्नागिरी : दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. “होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या” हे या वर्षाचे घोषवाक्य आहे. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (२४ मार्च) जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी (ART) डॉ. रश्मी आठल्ये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे, जिल्हा क्षयरोग विभागाचे व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून क्षयरोगाबद्दल माहिती दिली.

यावेळी क्षयरोग जनजागृतीबाबत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामध्ये एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सन २०२४ मधील टीबीमुक्त ग्रामपंचायतमधील निवड झालेल्या प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायत कापडगाव, झरेवाडी, पावस, टिके, टेंभ्ये यांच्या सरपंचांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह/पदक देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग कक्ष व बालरुग्ण कक्षात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यानंतर परिचारिका महाविद्यालय व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत रत्नागिरी शहरात क्षयरोग जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात क्षयरोग जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!