अर्णव कऱ्हाड यांचे एलएलबीची परीक्षेत यश

दापोली : येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांचे धाकटे सुपुत्र अर्णव कऱ्हाड यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. वकिलीच्या क्षेत्रात जाण्याचे त्यांचे स्वप्न यामुळे साकार झाले असून, त्यांच्या यशाबद्दल दापोली परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. भारत कऱ्हाड स्वतः सीए असून त्यांचे ज्येष्ठ सुपुत्रही सीए आहेत. त्यामुळे अर्णवनेही सीए व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. मात्र, अर्णवने स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडत कायद्याच्या शिक्षणाची वाट धरली. कुटुंबानेही त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अर्णवने सायन्समधून बीएससी पूर्ण केली. त्यानंतर एमएससी करण्याऐवजी कायद्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेत मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये एलएलबीला प्रवेश घेतला. नुकताच त्याचा एलएलबीचा निकाल जाहीर झाला असून त्याने कायद्याची पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
अर्णवला वक्तृत्व आणि ड्राफ्टिंगची आवड असून इंग्रजी भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व आहे. लोकांशी सहज संवाद साधण्याची त्याची पद्धत आहे. न्यायाधीश होण्याचे स्वप्न घेऊन तो कायद्याच्या क्षेत्रात आला असून, त्या दिशेने पुढील वाटचाल करण्याचा त्याचा मानस आहे.
अर्णवच्या यशाबद्दल उद्योजक धनंजय यादव, डॉ. दशरथ भोसले, जानकी बेलोसे, सुनीता बेलोसे, डॉ. बालाजी केंद्रे, आई डॉ. सुवर्णा कराड आणि संजय बामणे, मनोहर मोरे यांच्यासह अनेकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



