मुख्य बातमीसामाजिक

चांदोर गावातील जिल्हा परिषद शाळेत छत्री वाटपाचा कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा नं १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कु. साहिल बाबू कोकरे यांच्या सहकार्यातून छत्री वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच सौ. पुनम मेस्त्री, उपसरपंच सूर्यकांत तांबे, पोलिस पाटील प्रवीण मेस्त्री, उद्योजक बाबू कोकरे, युवा उद्योजक संदीप तांबे, युवा उद्योजक श्रीकांत मेस्त्री, शिक्षणप्रेमी रमेश कोलगो, किशोर कोलगो, श्री. बंडगार व मुख्याध्यापक उपस्थित होते.

साहिल बाबू कोकरे हे नेहमीच शैक्षणिक कार्यात तत्पर असतात. अनेकदा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या, अंकपुस्तिका व दप्तर वाटप करून सहकार्य करण्यात आले होते. ते स्वतः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे बीएससी हॉर्टिकल्चरचे विद्यार्थी आहेत. वडील बाबू कोकरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन “आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे” या विचाराने साहिल कोकरे नेहमीच समाजकार्यासाठी तत्पर असतात.

हा कार्यक्रम पोलिस पाटील श्री. प्रवीण मेस्त्री यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी साहिल यांनी सांगितले की, “मी शेती विषयातील शिक्षण घेत असून, माझ्या शिक्षणाचा माझ्या गावातील शेतकऱ्यांना नक्कीच उपयोग होईल” अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी छत्रीची मदत होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!