मुख्य बातमी

राजापुरातील कळसेकर महाविद्यालयात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबिर

रत्नागिरी : शासकीय विश्रामगृह, राजापूर येथे दुरूस्तीचे कामकाज सुरू असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबीराचे कामकाज हे नॅशनल इंग्लिश स्कूल अँड ए. ई. कळसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत राजापूर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, वाहनाची पुनःनोंदणी व नवीन वाहनांच्या नोंदणीचे कामकाज शिबिरात पार पाडले जाते. हे कामकाज शासकीय विश्रामगृह, राजापूर येथे करण्यात येत होते. परंतु, शासकीय विश्रामगृह राजापूर येथे दुरूस्तीचे कामकाज सुरू असल्याने नागरिकांच्या सोयीकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबिराचे कामकाज हे नॅशनल इंग्लिश स्कूल अँड ए. ई. कळसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, राजापूर दसूर रोड, येथे करण्यात येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!