गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

रत्नागिरी : भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी पात्र गिग कामगारांना http://register.eshram.gov.in या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्म इकॉनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा, म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे झोमॅटो, स्विगी, ओला, कुबेर यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत काम करणारे डिलिव्हरी बॉय, रायडर, ड्रायव्हर आणि इतर लाखो गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.



