महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली संस्थेचा उपक्रम

गडचिरोली : येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने “नाट्यश्री” तर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला असून मागील वर्षी ३६ साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे.

या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कारासाठी २०२५” साठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य २०२४ च्या पुरस्कारासाठी स्वीकारले जाईल. तसेच १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य २०२५ च्या पुरस्कारासाठी स्वीकारले जाईल.

कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक/एकांकिका किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ, व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

सन २०२२-२३ या दोन वर्षांतील साहित्यकृतीतून प्रत्येक वाङ्मय प्रकारात १ व सन २०२४ मधील प्रकाशित पुस्तकांमधून प्रत्येक विभागात २ पुस्तकांची निवड करण्यात येईल; मात्र यापूर्वीच सादर करण्यात आलेली पुस्तके पुनश्च पाठवू नयेत. पुस्तके मिळताच व्हाट्सअपवर वैयक्तिकरित्या पोच दिल्या जाणार असून, यथावकाश निकालही कळविला जाणार आहे.

रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती, अल्पपरिचय, प्रस्ताव केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे (नाटककार), महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं. १७, राधे बिल्डिंगच्या मागे, चामोर्शी रोड, गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), (भ्रमणध्वनी ९६२३६६३४३५) या पत्त्यावर ३० जून २०२५ पर्यंत पाठवावे, असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी एका निवेदनाद्वारे केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!