पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ ! प्रतिलिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन

मुंबई : अमेरिका युद्धामुळे महागाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. भारतावरही या युद्धाचे गंभीर परिणाम झाले असून, इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून (१५ मे) ही दरवाढ लागू झाली आहे.
बऱ्याच काळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात आज शुक्रवारी (१५ मे) वाढ झाली. युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या असून, त्याचबरोबर आयातीवरही परिणाम झाला आहे. तेलाच्या आयातीचा खर्च वाढला असून, याचा थेट भार आता ग्राहकांवर पडण्यास सुरूवात झाली आहे.
नव्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीमध्ये तीन रुपयाच्या वाढीसह पेट्रोलचे दर प्रति लिटर ९७.७७ रुपयांवर पोहोचले आहेत. डिझेल दरही प्रति लिटर ९०.६७ रुपये इतके झाले आहेत.
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल १०६ रुपये प्रति लिटरवर गेले आहे.आता मुंबईत डिझेल प्रति लिटर ९३.१४ प्रति लिटर दराने मिळत आहे.



