जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय : भंते सुमेध बोधी

आबलोली (संदेश कदम) : बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही. मानवतावादानेच मानवी जीवनाचे कल्याण साधता येईल. मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच यावर एकमेव उपाय आहे, असे स्पष्ट मत भिक्खू संघाचे राष्ट्रीय महासचिव आणि पूज्य भंते डॉ. सुमेध बोधी यांनी केले.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समिती गाव शाखा खरशेत, धम्मभूषण विकास संघ खरशेत मुंबई, यशोधरा महिला मंडळ तसेच सम्यक युवा मंच आयोजित भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न, विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. खेरशेत (ता. चिपळूण) येथील तक्षशिला बुद्ध विहाराच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुसरे पुष्प गुंफताना पूज्य भंते डॉ. सुमेध बोधी यांनी पाच बौद्ध भिक्खू यांच्या समवेत धम्म देसना दिली. त्यावेळी ते बोलत होते.
बौद्ध भंते डॉ. बोधी पुढे म्हणाले की, बुद्ध धम्म आपल्याला अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेतो. बुद्ध धम्मात सर्वांचा आदर केला जातो. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागा. आई-वडिल यांचा आदर करा. तसेच पशु, पक्षी, प्राणी यांच्यावर दया करा. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हीच शिकवण गौतम बुद्धांनी आपल्या बुद्ध धम्मात दिलेली आहे. या विज्ञानवादी धम्माचे आपण काटेकोरपणे पालन करूया व आपले जीवन सुखमय आणि समृद्ध करूया असा त्यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार पर्यटन विभागाचे सचिव महेंद्र कदम, मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष नवनीत कदम, दयानंद कदम, सचिव संजय कदम, महिला संघटनेच्या अध्यक्षा शैला कदम, साक्षी कदम, प्रबोधिनी कदम, प्रज्ञा कदम, मुंबई संघटनेचे माजी अध्यक्ष शरद कदम, ज्येष्ठ सल्लागार चंद्रमणी कदम, अनंत कदम, प्रदीप कदम, उपाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक विजय कदम, सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशीराम कदम गुरुजी, सम्यक युवा मंच सचिव अक्षय कदम, हर्ष कदम, मिहिर कदम, रोशन कदम, राहुल कदम, प्रतीक मोहिते, राजू कासारे, रूपेश कासारे, करुणा कदम, प्रिया कदम, संघरक्षिता कदम, मनाली कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गाव व मुंबई संघटनेच्या सर्व सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.



