आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
मनसे गुहागर शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा सत्कार करून कृषी दिन साजरा

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) गुहागर पक्षाच्या वतीने आणि शेतकरी संघटनेच्या वतीने गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सत्कार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृषी दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
कृषी दिन हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येतो. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर यांच्या हस्ते शेतकरी शरद सावंत, हितेश राऊत, विनायक चव्हाण आदींनी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.



