मुख्य बातमी

कार्यतत्पर आणि कार्यनिष्ठेचा आदर्श घ्यावा : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

दप्तरी अजित पड्याळ यांना निरोप

रत्नागिरी : “कामाबद्दलची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता या श्री. पड्याळ यांच्या गुणांचा आदर्श आजच्या पिढीने घेणे आवश्यक आहे,” असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.

जिल्हा माहिती कार्यालयातील दप्तरी अजित भिकाजी पड्याळ हे ४० वर्षांच्या दीर्घकालीन सेवेनतंतर नियत वयोमानानुसार काल (३१ मार्च) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना श्री. सातपुते म्हणाले, “आपल्या कार्यकाळात श्री. पड्याळ यांनी आपले कर्तव्य कधीही टाळले नाही. त्यांच्यावर कार्यालयाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली, असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लिपिक टंकलेखक अमृता भातडे यांनी श्री. पड्याळ यांच्या कार्यतत्परतेविषयी किस्सा सांगून गेली १० वर्षे सोबत काम केल्याचे सांगितले.

यावेळो श्री. पड्याळ, त्यांच्या पत्नी अश्विनी यांचा कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना श्री. पड्याळ यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला श्री. पड्याळ यांच्या पत्नी आश्विनी पड्याळ, मुलगा अनिष पड्याळ, सून अवनी पड्याळ, नातू प्रियांश तसेच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक योगेश मोडसिंग, सहाय्यक छायाचित्रकार रूपेश कांबळे, वाहनचालक जहाबीर पटेल, दप्तरी शशिकांत भोसले, दप्तरी संदीप पिलणकर, शिपाई माधवी शिंदे, शिपाई दैनंदिनी आंबेकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!