राजापूर तालुक्यात दहावीत प्रथम आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी केला सत्कार

राजापूर : तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर पाचल हायस्कूलचा अर्थव मोरे व अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली हायस्कूलची आदिती वायबसे यांनी ९८.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. इयत्ता दहावीच्या परीक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार (२२ मे) सरस्वती विद्यामंदिर पाचल येथे पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल, अर्जुना खोरे विकास मंडळ कारवली आणि पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघ मिठगवाणे यांच्या संयुक्त कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर जेष्ठ नाटककार, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल या संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे, सरचिटणीस रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोर नारकर, संचालक आण्णा पाथरे, अर्जुना विकास खोरे विकास मंडळ कारवली या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वरेकर, सरचिटणीस डॉ. विश्वास जाधव, पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्था अध्यक्ष विलास चेऊलकर, उपाध्यक्ष एकनाथ आडीवरेकर, सचिव रमेश राणे, राजापूर तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष राजन लाड, स्प्लँश आर्ट्स अकॅडमी जैतापूर संचालक राकेश दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान पाचल हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय छत्रालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पाचल विभागात विभागात प्रथमच आलेले नाटककार गंगाराम गवाणकर यांचा नाट्यकर्मी व उपस्थित सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. या कार्यक्रप्रसंगी विजय मोर्ये, विकास कोलते, सुरेश साळवी, बाबा सावंत, सरस्वती विद्या मंदिर पाचल शाळेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई, माजी विद्यार्थी फेडरेशन असोसिएशनचे अध्यक्ष राजू रेडीज, सुशील नारकर, अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवलीचे मुख्याध्यापक राजेश तेरवण, पत्रकार उमेश दळवी, किसान व कन्या छात्रालय पाचल अधीक्षक विद्या वाकडे, शैलेश हुंदळेकर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविस्कर यांनी केले.



