आरोग्यमहाराष्ट्रमुख्य बातमीसामाजिक

नायर रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाला ‘सीएसआर’अंतर्गत अत्याधुनिक उपकरणे प्राप्त

अत्याधुनिक व पोर्टेबल उपकरणांमुळे रुग्ण तपासणीचा वेग वाढणार : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लहान मुलांची तपासणी करणे सुलभ होणार

मुंबई : सेंट्रल परिसरात असणारे बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एक प्रमुख रुग्णालय असून दररोज असंख्य गरजू नागरिक या रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा लाभ घेत असतात. या रुग्णालयात असणाऱ्या नेत्रचिकित्सा विभागात डोळ्यांशी संबंधित बहुस्तरीय उपचार गरजू रुग्णांवर नियमितपणे करण्यात येत असतात. नायर रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाला ‘ख्याति केमिकल्स प्रा. लि.’ आणि ‘डॉर्फ केटल प्रा. लि.’ (DORF KETAL) या उद्योगांच्या सामाजिक दायित्वांतर्गत (Corporate Social Responsibility) अत्याधुनिक उपकरणे नुकतीच उपलब्ध झाली आहेत. या उपकरणांचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ही उपकरणे ‘पोर्टेबल’ अर्थात आकाराने लहान असल्याने डॉक्टरांना सहजपणे हातात घेऊन ती वापरता येणार आहेत. ज्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णापर्यंत हे उपकरण घेवून जाणे सहज शक्य होणार आहे. परिणामी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुले इत्यादींची तपासणी अधिक सहजतेने व सुलभतेने करणे शक्य होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नेत्रचिकित्सा विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. नयना पोतदार यांनी सांगितले की, ‘ख्याति केमिकल्स प्रा. लि.’ आणि ‘डॉर्फ केटल प्रा. लि.’ या उद्योगांच्या सामाजिक दायित्व या अंतर्गत प्राप्त झालेली अत्याधुनिक उपकरणे वापरण्यास आता सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी दि. १ ते ७ एप्रिल या दरम्यान देशभरात ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण सप्ताह’ साजरा करण्यात येतो. या सप्ताहादरम्यानच या अत्याधुनिक उपकरणांच्या वापरास नायर रुग्णालयात सुरुवात झाली असून या उपकरणांमुळे मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रिनिंग आदी आजारांचे वेळेवर निदान करणे शक्य होत आहे.

या प्राप्त झालेल्या उपकरणांमध्ये Hand Held Non Mydriatic Fundus Camera, B Scan, Hand Held Portable Tonometer आणि A Scan या उपकरणांचा समावेश आहे. या उपकरणांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वरीलपैकी Fundus Camera व Tonometer या उपकरणांना आपल्या मोबाईल फोन प्रमाणेच अंतर्गत ‘बॅटरी’ व ‘मेमरी स्टोरेज’सह ‘ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी’ची सुविधा आहे. ज्यामुळे, ही उपकरणे ‘चार्ज’ करुन सहजपणे रुग्णापर्यंत नेऊन उपयोगात आणता येऊ शकतात. तसेच उपकरणांमध्ये ‘मेमरी स्टोरेज’ व ‘ब्ल्यू टूथ’ सुविधा असल्यामुळे यातील नेत्र तपासणीचे व्हिडिओ, फोटो इत्यादी सहजपणे जतन व ‘ट्रान्स्फर’ करता येऊ शकतात. त्याचबरोबर ही उपकरणे नायर रुग्णालयाद्वारे आयोजित करण्यात येणा-या वैद्यकीय शिबिरांमध्ये देखील सहजपणे नेऊन वापरता येऊ शकणार आहेत, अशीही माहिती डॉ. पोतदार यांनी दिली आहे.

ही उपकरणे नायर रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाला प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला ‘नवदृष्टी’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष व ‘डॉर्फ केटल प्रा. लि.’ चे सल्लागार प्रा. डॉ. नागेश टेकाळे, ‘खाती केमिकल्स प्रा. लि.’ चे उपाध्यक्ष (सी. एस. आर.) श्री. संतोष जगधने, ‘सप्रेम’ या स्वंयसेवी संस्थेचे श्री. अमित कवठेकर व श्री. भाऊसाहेब वाविकार यांच्यासह नायर रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागातील संबंधित वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपकरण क्र. १) Hand Held Volk Non Mydriatic Fundus Camera या उपकरणाच्या मदतीने डोळ्याची बाहुली ड्रॉप टाकून प्रसरण न करता नेत्रपटलाची तपासणी करुन फोटो काढणे शक्य. यामुळे मधुमेह, उच्चक रक्तरदाब ह्या आजारांमुळे नेत्रपटलाचे होणारे (Retina) नुकसान इत्यादींची तपासणी शक्य.

उपकरण क्र. २) Hand held portable Keeler B scan या उपकरणाच्याु मदतीने पिकलेला मोतीबिंदू असलेल्या डोळ्याच्या नेत्रपटलाची तपासणी करता येते. तसेच डोळ्याला इजा झाली असेल, डोळ्यांच्या आतमध्येल बाहेरील वस्तूा (Foreign body) असेल किंवा डोळ्यांचे ट्युमर्स इत्यादींची तपासणी करणे शक्य.

उपकरण क्र. ३) Hand held portable tonometer च्याा मदतीने अगदी सुलभरित्याी डोळ्यांचे प्रेशर चेक करता येते व काचबिंदुसारख्याl आजारांवर वेळीच उपचार करणे सुलभ होते.

उपकरण क्र. ४) A Scan च्याl मदतीने डोळ्यांचे मोजमाप करुन डोळ्यांची क्षमता (Intra Occular Lens Power Calculations) निर्धारित करणे शक्य होते. ज्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेस फायदा होतो.

• वरील उपकरणे ही आकाराने लहान असल्यामुळे सहजपणे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेणे शक्य.

• उपकरणांमध्ये ‘बॅटरी’ असल्यामुळे जिथे विजेची उपलब्धता नाही, अशा ठिकाणी देखील वापर शक्य.

• उपकरणांमध्ये ‘मेमरी स्टोरेज’ सुविधा असल्यामुळे रुग्णांच्या डोळ्यांच्या तपासणीची माहिती जतन करणे शक्य.

• उपकरणामध्ये ‘ब्ल्यू टूथ’ सुविधा असल्यामुळे उपकरणात जतन असलेली डोळ्यांच्या तपासणीची माहिती सहजपणे दुस-या संगणकीय उपकरणावर पाठविणे शक्य.

• या उपकरणांच्या उपलब्धततेमुळे बाह्य रूग्ण विभागाला भेट देणाऱ्या तसेच दुर्गम भागांमध्ये शिबिरांना उपस्थित राहणा-या गरजू रुग्णांना उच्च दर्जेदार नेत्रासेवा देणे शक्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!