मुख्य बातमीशैक्षणिक

देव, घैसास, कीर महाविद्यालयात अर्थशास्त्रातील करिअर संधीवर व्याख्यान

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयातील करिअर संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. रामा सरतापे उपस्थित होते.

व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना आपली ध्येय निश्चिती करण्याचे महत्त्व सांगितले. प्रत्येक क्षेत्रातील अर्थशास्त्राचे महत्त्व, एमपीएससी आणि यूपीएससी तसेच आईएस आणि आयएसएस या स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व विषद केले. तसेच त्यातील विविध विषय आणि एकंदरीत अर्थशास्त्र विषयाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, अर्थशास्त्र विभाप्रमुख युक्ता शिवदे, विज्ञान विभाग प्रमुख वैभव घाणेकर आणि प्रा. वैभव कीर उपस्थित होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष वाणिज्य, प्रथम वर्ष कला शाखेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. युक्ता शिवदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!