मुख्य बातमी
राम नवमीनिमित्त पालकमंत्री सामंत यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन

रत्नागिरी : श्रीराम नवमीचे औचित्य साधत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील राम आळी येथील पुरातन श्रीराम मंदिरात जाऊन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. “दरवर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मी येथे येऊन दर्शन घेत असतो. प्रभू रामाचा आशीर्वाद माझ्यावर कायम असल्याचे समाधान मला यनिमित्ताने मिळत आहे,” असे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी म्हटले.
या प्रसंगी श्रीराम मंदिर समितीच्या वतीने सामंत यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी अनेक पदाधिकारी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी श्री राम नवमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि प्रेमळ स्वागताबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


