मुख्य बातमी

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर महिन्यासाठी ३५ किलो मोफत अन्नधान्य मंजूर

जिल्ह्यातील ३७ हजार १६५ कुटुंबांना होणार लाभ : ६६०.२५ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७८.५० मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध

रत्नागिरी : जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी नोव्हेंबर २०२६ या महिन्याचे अन्नधान्य वाटप मंजूर करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३७ हजार १६५ अंत्योदय कार्डधारकांना प्रति शिधापत्रिका एकूण ३५ किलो अन्नधान्य वितरित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन वाघ यांनी दिली.

प्रत्येक अंत्योदय शिधापत्रिकेवर २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू या प्रमाणात वाटप केले जाईल. यानुसार नोव्हेंबर महिन्याकरिता जिल्ह्यासाठी एकूण ६६०.२५ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७८.५० मेट्रिक टन गहू अशा एकूण धान्य साठ्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. भारतीय अन्न महामंडळ (FCI) पनवेल यांच्याकडून हा संपूर्ण साठा उचलण्यात आला असून तो संबंधित गोदामांपर्यंत पोहोचवला जात आहे.

तालुका व गोदामनिहाय वाटपाचा तपशील :

मंडणगड : १५६१ कार्डधारकांसाठी २५.५० मेट्रिक टन तांदूळ आणि १८.५० मेट्रिक टन गहू.

दापोली : ३२०४ कार्डधारकांसाठी ४७.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ३५ मेट्रिक टन गहू.

खेड : ३८७४ कार्डधारकांसाठी ७२ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७ मेट्रिक टन गहू.

गुहागर : ३२६० कार्डधारकांसाठी ५६.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ४२ मेट्रिक टन गहू.

चिपळूण : ६००९ कार्डधारकांसाठी सर्वाधिक १११ मेट्रिक टन तांदूळ आणि ८३ मेट्रिक टन गहू.

संगमेश्वर गोदाम : ३९७६ कार्डधारकांसाठी ६८.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ४०.५० मेट्रिक टन गहू.

देवरुख गोदाम : ३०९८ कार्डधारकांसाठी ५५.५० मेट्रिक टन तांदूळ आणि ४५.५० मेट्रिक टन गहू.

रत्नागिरी गोदाम : २७३० कार्डधारकांसाठी ४८ मेट्रिक टन तांदूळ आणि ३६ मेट्रिक टन गहू.

जयगड गोदाम : १२६६ कार्डधारकांसाठी १९ मेट्रिक टन तांदूळ आणि १४.५० मेट्रिक टन गहू.

पाली गोदाम : ५०१ कार्डधारकांसाठी १० मेट्रिक टन तांदूळ आणि ७.५० मेट्रिक टन गहू.

लांजा : ३४५३ कार्डधारकांसाठी ६४ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७ मेट्रिक टन गहू.

राजापूर गोदाम : ३४६५ कार्डधारकांसाठी ६९.२५ मेट्रिक टन तांदूळ आणि ५२ मेट्रिक टन गहू.

पाचल गोदाम : ७६८ कार्डधारकांसाठी १३.५० मेट्रिक टन तांदूळ आणि १० मेट्रिक टन गहू.

जिल्ह्यातील सर्व पात्र अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी आपल्या नजीकच्या रास्त भाव दुकानातून नोव्हेंबर महिन्याचे धान्य वेळेत प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!