मुख्य बातमी

१६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पटवर्धन हायस्कूल येथे रविवारी मतदारांना शपथ

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूल २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता १६व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाणार असून, त्यानुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा विधी सेवाचे सचिव आर.आर. पाटील आदी मान्यंवर उपस्थित राहणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी सर्वसमावेशक प्रचार प्रसाराचा आराखडा जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थाशी भागीदारी व सहयोग, समाजमाध्यमामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम यासंदर्भात सविस्तर सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!