जि.प. पूर्णगड शाळा क्र.१मध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद .शाळा पूर्णगड नं. १ या शाळेत आरोग्य विभागाच्या रत्नागिरी तालुका कीटक सनियंत्रक श्रीमती मेस्त्री, पूर्णगड गावच्या आरोग्यसेविका पावरी सिस्टर यांच्यामार्फत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. परिसरातील डासांपासून होणारे कीटकजन्य आजार व दूषित पाण्यामुळे होणारे जलजन्य आजार, हे आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना यांविषयी उत्तम आणि सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागाच्या या जनजागृतीच्या उपक्रमाला शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.


