मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक
जि. प. शाळा निवे बु. जोयशीवाडीच्या सान्वीची नवोदय परीक्षेत चमक

संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. शाळा निवे बु. जोयशीवाडी या शाळेतील विद्यार्थिनी सान्वी संदीप पाष्टे हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. यासाठी तिला वर्गशिक्षक श्री. भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुरव व वडील श्री. संदीप पाष्टे यांचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण भागातील या शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी निवे जोयशीवाडी शाळेतील विद्यार्थी इ. ५ वी शिष्यवृत्तीधारक ठरले असून एक विद्यार्थिनी सन २०२१ मध्ये नवोदय विद्यालय प्रवेश पात्र ठरली होती.
गेले अनेक वर्ष या शाळेतील विद्यार्थी मंथन, बीडीएस या परीक्षेमध्ये जिल्हा तसेच राज्यस्तरावर सुयश संपादन करत आहेत. सान्वीच्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला आहे.



