पाली ग्रामीण रुग्णालयात अण्णा सामंत यांच्या हस्ते महाडायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा

रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पाली येथे १३ एप्रिल रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान व एचएलएल यांच्या संयुक्त विद्यमाने महाडायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी भूषविले. डायलिसिस लोकार्पण सोहळ्याप्रसंगी डॉ. जगताप आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे यांनी सर्व मान्यवरांची स्वागत केले. डॉ. कुमरे यांनी प्रास्ताविक करताना पाली ग्रामीण रुग्णालयाच्या उल्लेखनीय बाबी व डायलिसिस या आजाराविषयी सखोल विवेचन केले.

याप्रसंगी प्रमुख मान्यवर उद्योजक रवींद्र (अण्णा) सामंत यांनी डायलिसिस विभागाला शुभेच्छा दिल्या व चांगल्या पद्धतीने रुग्णांची सेवा करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी डायलिसिसचे महत्त्व काय आहे व रुग्णाला डायलिसिस का करावे लागते, आपल्या दैनंदिन आयुष्यातील ज्या वाईट गोष्टींमुळे आपल्या शरीरातील अवयवांवर दुष्परिणाम होतो त्या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या डायलेसिस लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर उद्योजक आर. डी. सामंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे यांच्यासह मूत्रपिंडविकार डॉ. अमय बेडेकर, डॉ. विनोद कानगुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन साळुंखे, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँकेचे संचालक रामभाऊ गराटे, सचिन (तात्या) सावंत, संदीप गराटे, प्रकाश परपते, गुरुनाथ (बाबा) गराकटे, एचएलएल जिल्हा समन्वयक दुर्वेश खाके व डायलिसिस विभागाचे तंत्रज्ञ व कर्मचारी वर्ग पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व डायलिसिसचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, त्याबरोबर ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



