मुख्य बातमी
उद्योजक दीपक पवार यांची श्रीराम मंदिराच्या विश्वस्त पदी निवड

रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर देवस्थानचे नूतन विश्वस्त म्हणून रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक पवार यांची निवड झाली आहे. त्यांनी गुरुवारी त्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
त्यांनी राम दरबारात जाऊन देवतांची पूजा केली. यावेळी त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावे व त्यांनी हाती घेतलेल्या कार्यात त्यांना उत्तम यश लाभावे यासाठी प्रभू श्रीरामचंद्राला साकडे घालण्यात आले.



