मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

चिपळूणमध्ये अमली पदार्थविरोधी लढ्यासाठी शिवसेना महिला आघाडीचा पुढाकार

पोलीस विभागाकडून ॲक्शन रोड मॅप तयार : प्रकाश बेले

चिपळूण : शहरात तरुणांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने आज पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांच्याकडे केली.

शाळा व महाविद्यालय परिसरात काही युवकांकडून ‘धूम स्टाईल’ने होत असलेल्या बेदरकार वाहनचालनाचा मुद्दाही यावेळी तीव्रतेने मांडण्यात आला.

या पार्श्वभूमीवर एसडीपीओ प्रकाश बेले यांनी सांगितले की, पोलीस विभागाकडून अमली पदार्थविरोधी आणि वाहतूक नियमभंगाविरोधात ॲक्शन रोड मॅप तयार करण्यात आला असून, समाजाच्या सहकार्यानेच ही लढाई प्रभावीपणे लढता येईल. दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीदरम्यान शिवसेना चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव (बाळा) कदम, महिला विधानसभा क्षेत्र संघटिका सौ. रुमा देवळेकर आणि महिला शहर संघटिका वैशाली शिंदे यांनी तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कडक व ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली.

चिपळूणचे सुरक्षित आणि स्वच्छ भविष्य घडवण्यासाठी पोलीस व समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांची ही सुरुवात ठरणार आहे, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

या भेटीत तालुका प्रमुख बळीराम गुजर, तालुका संघटिका सौ. मानसी भोसले, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, उपतालुका संघटिका दीप्ती सावंत देसाई, उपशहरप्रमुख संतोष पवार, विभागप्रमुख अजित गुजर, मनोज पांचाळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, युवती अधिकारी तीर्था लाड, शाखाप्रमुख माधवी दिवटे, शाखा संघटिका निखी साळुंखे, उपशाखा संघटिका सुहासिनी मुकादम, सौ. वैशाली मानकर, सौ. अनिता पिसे, सौ. विद्या महाडिक आणि सुनील सावंत-देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!