क्रीडामुख्य बातमी

जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुका संघाची दमदार कामगिरी

रत्नागिरी : तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने १९ वी जिल्हास्तरीय खुली तायक्वॉंदो स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे झाली. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो अँड फिटनेस अकॅडमीतील खेळाडूंनी पदक संपादन केले.

स्वर्णिम श्रेयश शेट्ये, तेजस्वी दशरथ लाड, भक्ती भागवत कुंभार हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. अन्वी सचिन पवार, आराध्य कमलाकर सावंत यांनी रौप्य पदक, तर प्रिया प्रमोद लांजेकर, राजवर्धन रणजीत माने, आर्या कृष्णा आग्रे, आदिश्री अभय शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे यांनी कास्यंपदक पटकावले. तसेच आर्या ओंकार देसाई, विघ्नेश विनोद दिवाळे, तनया संदीप पाटकर, वैष्णवी विजय मंचेकर, निधी रवींद्र लिंगायत, वृत्ती रंजन पावसकर, आराध्या कृष्णा आग्रे, आर्या सचिन पवार, रोहन चंद्रकांत साबळे आदी रंजन पावसकर, प्रशांतसिंग विजयसिंग चव्हाण, सागर संतोष चौगुले हे स्पर्धेत सहभागी झाले होते.

या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले. या सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, शीतल विरेंद्र आचरेकर, गणेश ईश्वर तोंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व पदक विजेते व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक यांचे तायक्वांदो फिटनेस अकॅडमी लांजा चे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य लक्ष्मण कररा, रोहित कांबळे, अकॅडमीचे मार्गदर्शक तेजस वडवलकर व समस्त पालकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!