क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीच्या युवा मल्लांची ऐतिहासिक कामगिरी

आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : सातारा येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याला प्रथमच राज्यस्तरीय प्रतिनिधित्व मिळाले असून, जिल्ह्याच्या सुपुत्रांनी घवघवीत यश मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले.

यामध्ये ५२ किलो वजन गटात सोहम खंडेराव पाटील याने, तर ५७ किलो वजन गटात समर्थ कुदळे याने सुवर्णपदक पटकावत थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तसेच, १७ वर्षांखालील मुलींच्या ४८ किलो वजन गटात अनुराधा गांजवे हिने तिसरा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या यशात भर घातली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कदम सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले, तर या संपूर्ण प्रवासात रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे विशेष सहकार्य मिळाले.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल कुरतडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक श्री. मांडवकर, ज्योती आंबर्डेकर आणि लीना आंबर्डेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!