मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

संदीप मोहिते यांच्या “माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” या गाण्याला लोकप्रियता

अल्पावधीतच १ मीलियन व्ह्यूज

आबलोली : गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र संदीप मोहिते यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळत अनेक स्वरचित गाणी लिहिली आहेत. त्यातीलच “माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” या स्वरचित गौळणीला चालबद्ध केले असून, त्यांची हे गाणे युटूबवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला अल्पावधीतच १ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे कोकणात पूजेला आणि नमनाच्या प्रत्येक कार्यक्रमातही तितकेच गाजते आहे.

“माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” या गाण्याला रसिकांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेले आहे. या गाण्याला गीतकार संदीप मोहिते यांनी चालबद्ध केले असून, हे गाणे रिया बैकर हिने गायले आहे. तर प्रणेश शिगवण, प्रभाकर मास्कर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे म्युझिक प्रोडक्शन स्टुडिओ लाईन म्युझिक सुयोग साळवी यांनी केले आहे. रूपेश पाते याने कृष्णाची, तर रागिणी शितप हिने राधाची भूमिका साकारली आहे. सुयोग राणे यांनीही यात सादरीकरण केले आहे. या गाण्याची व्हिडिओग्राफी रूपेश राऊत, रोहित माचीवाले यांनी केली, तर सौरभ अजगोलकर यांनी ड्रोनद्वारे व्हिडिओग्राफी केली आहे.

“माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” हे गाणं तुफान गाजतयं तसेच “येते माघारी जरा थांब”, भुलली मी कान्हा तुला” ही गाणी सुध्दा संदीप मोहिते यांनी लिहिली असून युटूबवर गाजत आहेत. कोकण माझी माय प्रोडक्शनची संपूर्ण टीम संदिप मोहिते यांना सहकार्य करीत असून यामध्ये कोरोग्राफर व गायक राज कातकर, संगीत सागर कदम, कलाकार प्रथमेश शिगवण, चाफनाथ दसम, सुरेश दसम याचबरोबर शैलेश शितप, मधुकर दसम, रोहित सावंत, दीप्ती राऊत तसेच विकास मोहिते, महेश मोहिते आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!