मुख्य बातमी

ठाकरे शिवसेना युवासेनेतर्फे काळबादेवी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक

रत्नागिरी : युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काळबादेवी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा व क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत अनन्या अमित मयेकर, आरोही सूचित मयेकर, यश दिनेश बिर्जे व शुभ्रा गणेश भोळे यांना मोठे यश प्राप्त झाले. तर क्रीडा स्पर्धेत अनुज अमोल शेट्ये (लांब उडी- तालुकास्तर) यश दिनेश बिर्जे (बुद्धिबळ-तालुकास्तर), अन्वी विनय मयेकर (लांब उडी- केंद्रस्तर), तर पूर्वी ऋषिकेश शेट्ये हिला (धावणे-केंद्रस्तर) प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड, सहाय्यक शिक्षक महेश आरेकर, श्रीमती वैशाली झोरे व श्रीमती अमृता काजवे यांनी विशेष मेहनत घेतली.

शाळेत खेळायला मैदान नसताना सुद्धा विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मिळणारे दैदीप्यमान यश बघून भारावून गेलो असून शाळेला मैदान प्राप्त होण्यासाठी विशेष मेहनत घेऊ, असे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री. सावंत यांनी केले.

या सत्काराप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख व शिक्षकवर्गासह ज्येष्ठ शिवसैनिक बंड्या पेटकर, शाळा कार्यकारिणी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. सावली मयेकर, अंगणवाडी सेविका सौ.राखी भोळे, युवासेना समन्वयक साई गावडे, काळबादेवी शाखाप्रमुख ओंकार वायंगणकर, उपशाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, युवासेना स्थानिक प्रतिनिधी रणजितसिंग मालगुंडकर उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुवड यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!