भाजपा व जय हो प्रतिष्ठानकडून आज शालेय गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मध्ये आयोजन

रत्नागिरी : जय हो प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शालेय गणवेश व साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मधील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप व शालेय साहित्य वाटप असा कार्यक्रम आज (२२ जुलै) सायंकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे.
जय हो प्रतिष्ठान, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आयटी जिल्हाप्रमुख नीलेश आखाडे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाटलेकर व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी दामले विद्यालय समोर जोगळेकर हॉल येथे आज सायंकाळी ५.३० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



