मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर हायस्कूलमध्ये जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : श्रीदेव गो. कृ. माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गुहागर विद्यालयात अमली पदार्थ विरोधी कायदा, अल्पवयीन विद्यार्थ्यांसाठी संरक्षक कायदे यांविषयी गुहागर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक श्री. भोपळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस. एस. कांबळे, सौ. एम. एन. खानविलकर, श्री. पी. बी. जाधव उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत उर्वी रूपेश बागकर (नववी), अक्षरा दिनेश दाभोळकर (नववी) आणि विदिशा प्रदीप जाधव (आठवी) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावून सुयश संपादन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. एस. एस. ठाकूर व श्रीमती एस. एस. भोसले यांनी काम पाहिले.

सुयशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ , मुख्याध्यापक एस. एस. कांबळे व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!