कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमान जन्मोसवानिमित्त विविध कार्यक्रम

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात १ व २ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ एप्रिल रोजी सकाळी अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी महिलांचे हळदीकुंकू समारंभ, स्थानिक भजन, रात्री १०.३० वा. सुधीर भायनाक लिखित, दिनेश बागकर दिग्दर्शित श्री हनुमान नाट्य मंडळ कोतळूक उदमेवाडीचे रात्रीस खेळ चाले हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. उद्या (२ एप्रिल) रोजी पहाटे स्थानिक भजन, सकाळी ६.३३ वा. श्रींचा जन्मोत्सव, आरती, प्रसाद, दुपारी १.३० वा. हभप डॉ. श्रीपाद जोगळेकर (हेदवी) यांचे कीर्तन, सायंकाळी ५ वा. श्रींची पालखीतून मिरवणूक, रात्री १० वा. गुणवंत व मान्यवरांचा सत्कार, रात्री १०.३० वा. श्री वरदान वाघजाई नाट्य नमन मंडळ, माभळे जाधववाडी (ता. संगमेश्वर) यांचे नमन असे विविध कार्यक्रम होतील. असून बहुसंख्येने भक्तगणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष समीर ओक, महिला मंडळ अध्यक्ष सौ. मेघा महाडीक यांनी केले आहे.


