रत्नागिरी पोलीस दलाला समुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांना वाचविण्यात यश

रत्नागिरी : पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस व रनपार या गावातील एकूण १६ तरुण २९ एप्रिल रोजी मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स केमिकल जेटी जवळ “सरस्वती” नामक एका बोटीने समुद्रात फिरण्यासाठी गेले होते; परंतु समुद्र खवळलेला असल्याने या १६ तरुणांना घेऊन जाणाऱ्या सरस्वती बोटीमध्ये बिघाड निर्माण झाल्याने बोट पलटी झाली व सर्व तरूण पाण्यात ओढले गेल्याची दुर्घटना घडली; मात्र रत्नागिरी पोलिसांना या सर्व तरुणांना वाचविण्यात यश आले आहे.
ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळच असणाऱ्या दुसऱ्या एका “अल फरदिन” या बोटीवरील तांडेल फटीद ताजुद्दीन तांडेल यांनी तसेच रत्नागिरी पोलीस दलाचे सुरू असलेले “सागर कवच” अभियान दरम्यान बंदोबस्तासाठी “सिल्वर सन” या पायलट बोटीवर तैनात पोलीस अंमलदार HC/मुजावर, MSF चे जवान विजय वाघवे व अपूर्व जाधव यांनी या सर्वांना तात्काळ मदत करत बुडत असलेल्या १६ तरुणांना वाचवण्यामध्ये मदत करण्यात आलेली आहे.
या सर्व १६ तरुणांना समुद्राच्या पाण्यातून मुखरूप बाहेर काढून पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्यानंतर सर्व या सर्वजणांवर प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सरस्वती बोट ही पाण्यात बुडलेली आहे. या घटनेचा अधिक तपास पूर्णगड पोलीस ठाणे करीत आहेत.



