क्रीडामुख्य बातमीराजकारण
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन निमंत्रित कार्यकारी मंडळ सदस्यपदी ठाकरे सेनेचे मिरजोळे विभागप्रमुख वैभव पाटील

रत्नागिरी : जिल्हा कबड्डी असोसिएशन निमंत्रित कार्यकारी मंडळ सदस्यपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिरजोळे विभागप्रमुख वैभव विठोबा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण, उपतालुका प्रमुख श्री विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, विभाग प्रमुख मयुरेश पाटील यांनी वैभव पाटील यांचे अभिनंदन केले.



