मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

पिरंदवणे नं. १ शाळेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सौजन्याने छत्री वाटप

संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना पावसाळी छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, खाडी विभाग प्रमुख महेश देसाई, उपविभाग प्रमुख योगेश मुकादम, उपविभाग प्रमुख दीपक शिंदे, महिला विभाग प्रमुख सौ. पूनम देसाई, पिरंदवणे ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन सदस्य प्रकाश गमरे, जि. प. घेवडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक अतुल कदम, जि. प. निवईवाडी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा वराट यावेळी उपस्थित होते.

पिरंदवणे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. महेश देसाई यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले व शुभेच्छा दिल्या.

योगेश मुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिन इंगळे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!