मुख्य बातमी

रत्नागिरीत २४ जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २४ जून रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, पो. एमआयडीसी (ता. जि. रत्नागिरी) येथे होणार आहे.

२४ जून रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये या दिवशी मुलाखतीसाठी त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया या कार्यालयाकडे त्वरित प्रत्यक्ष अथवा या कार्यालयाचा दूरध्वनी क्र.(०२३५२)२९९३८५ वर संपर्क साधून नोंदणी करावी. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. तसेच रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र. मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!