सुयश कॉम्पुटर सेंटरतर्फे आर्या साळवीचा आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने एमएससीआयटीच्या बॅचची आदर्श विद्यार्थी म्हणून आर्या प्रशांत साळवी (काजुर्ली) हिला मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन तिचा गौरव करण्यात आला.
आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता दहावी, बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा गुणगौरव सोहळा नुकताच सुयश कॉम्प्युटर सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी आर्या साळवी हिला गौरविण्यात आले.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. प्रतीक पवार, ग्रामविकास अधिकारी बाबूराव सूर्यवंशी, उद्योजक गजानन साळवी, सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडिटर जगदीश साळवी, पत्रकार संदेश कदम आदी मान्यवर उपस्थित होत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका सौ. सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्रवीण आचरेकर, सिद्धी डिंगणकर, सलोनी मोहिते, विशाखा झगडे यांनी विशेष प्रयत्न केले. संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले.


