महाराष्ट्रमुख्य बातमी

ऑपरेशन सिंदूर : भारताचा ९ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

रात्री अडीच वाजता सर्जिकल स्ट्राईक

संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.

कुठल्या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

१) बहावलपूर २) मुरिदके ३) गुलपूर ४) भीमबर ५) चक अमरु ६) बाग ७) कोटली ८) सियालकोट ९) मुजफ्फराबाद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जय हिंद असं म्हणत पोस्ट केली आहे आणि ऑपरेशन सिंदूर हा फोटो पोस्ट केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!