मुख्य बातमी
भाट्ये-पावस रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ अंतर्गत भाट्ये-पावस रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणी दरम्यान रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. वाहनचालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या पाहणीमुळे भाटे-पावस मार्गावरील वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.



