मुख्य बातमी

आंबा घाटात दरड कोसळली; वाहने सावकाश चालवायचे आवाहन 

संगमेश्वर : साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

दरड कोसळत असल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच दरड कोसळण्याची शक्यता होती आणि अखेर ती प्रत्यक्षात घडली. यामुळे रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!